|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कार ट्रकला धडकून महिला ठार

कार ट्रकला धडकून महिला ठार 

आंबोलीत अपघात : कारचालक जखमी

वार्ताहर / आंबोली:

अंाबोली नांगरतास धबधब्यापासून 100 मीटर अंतरावर ट्रक आणि इंडिका कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील विद्या तुकाराम खोराटे (58, रा. मलगेवाडी अडकूर, ता. चंदगड) जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. अपघातात इंडिका कारचालक जिवा आंब्रज हे जखमी झाले.

ट्रकमधून गोपाळ स्वामी (23, रा. आंध्रप्रदेश) हा कुडाळ येथून खतासाठीचे मासे घेऊन चेन्नईला जात होता. ट्रकमध्ये त्यांच्यासोबत क्लीनर मनिष पशूपाल होता. तर जिवा आंब्रज (23, तामिळनाडू) हा इंडिका कार घेऊन अडकूर मलगेवाडी येथून गोव्याला जात होता. कारमध्ये विद्या खोराटे होत्या. त्या गोवा येथे राहणाऱया आपल्या मुलाकडे जात होत्या. नांगरतास धबधब्याजवळ कार आली असता कारची बेळगावच्या दिशेने जाणाऱया ट्रकला धडक बसली. त्यात खोराटे जागीच ठार झाल्या. तर कारचालक जिवा आंब्रज जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच आंबोली दूरक्षेत्राचे राजेश गवस, सुनील भोगण घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान खोराटे यांचे नातेवाईक आंबोलीत दाखल झाले. जखमी आंब्रज यांच्यावर आंबोलीत प्राथमिक उपचार करून सावंतवाडीत हलविण्यात आले. अपघातात कारचेही नुकसान झाले. ट्रकमध्ये खतासाठीचे मासे होते.