|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भक्तनिवासाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

भक्तनिवासाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

प्रतिनिधी  /  पंढरपूर

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचा आज मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम येथील भक्ती मार्गावर सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. 

मंदिर समितीच्या वतीने 85 कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे आज लोकार्पण होत आहे. या भक्तनिवासामध्ये सुमारे 1200 भाविक राहतील. इतकी सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.

या लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फ्ढडणवीस, महसूलमंत्री चंद्रकात पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा. शरद बनसोडे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. दत्तात्रय सावंत, आ. भारत भालके, आ. ऍड. रामहरी रूपनवर, नगराध्यक्षा साधना भोसले, प्रधान सचिन राजेश लढ्ढा, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित राहणार आहे.

 या सोहळयासाठी सध्या मंदिर समितीकडून तसेच प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, यासह समितीचे सर्व सदस्य, सल्लगार परिषदेचे सदस्य, सर्व कर्मचारी तसेच कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड नियोजन करीत आहेत.

  सोलापुरात राजव्यापी मेळाव्यास उपस्थिती

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सोलापूर विमानतळ येथून मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. पंढरपुरातील भक्त निवासाचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा सोलापूर विमानतळावर येणार आहेत. इंदिरा गांधी स्टेडीयम, पार्क चौक येथे दुपारी 1 वाजता ‘मी वडार महाराष्ट्राचा’ राज्यव्यापी मेळावा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.