|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जप्त करण्यात आलेल्या खैरीच्या झाडांच्या मालाची किंमत पाच लाख

जप्त करण्यात आलेल्या खैरीच्या झाडांच्या मालाची किंमत पाच लाख 

वाळपई प्रतिनिधी

 सत्तरी तालुक्मयातील अडवई याठिकाणी शनिवारी वनखात्याच्या भरारी पथकाने धाड घालून जप्त करण्यात आलेल्या खैरीच्या झाडांच्या तस्करी संदर्भाच्या प्रकरणात वनखात्याच्या यंत्रणेने उच्च पातळीवर चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. पकडण्यात आलेला माल  जरी पंचनाम्यात दीड लाखांच्या आसपास असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी नवीन मार्केट दराप्रमाणे सदरची किंमत सुमारे पाच लाखाची असण्याची शक्मयता वनखात्याच्या फोंडा विभागाचे वरि÷ अधिकारी कुलदीप शर्मा यांचे म्हणणे आहे.

 यामुळे सत्तरी तालुक्मयात अशाप्रमाणे खैरीच्या झाडाची तस्करी मोठय़ा प्रमाणात झाल्याचे प्रकार घडला असून याबाबत वनखात्याची यंत्रणा  पूर्णपणे सम्रभित झाली आहे. दरम्यान सदर झाडाची तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या दोन पैकी एक वाहनाच्या मालकाचा शोध लागला असून सगुण नाईक राहणार कुडाळ सिंधुदुर्ग हा कार (श्प्-43-ऱ-5477) गाडीचा मालक असल्याचे स्पष्ट झाले आहे.  झाडांची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिकअप संदर्भाच्या मालकाचा शोध अजून लागलेला नाही. याबाबत चौकशी करण्यात आल्यानंतर गाडीवर नमूद करण्यात आलेला क्रमांक(श्प्07-2662) हा बनावट असण्याची शक्मयता श्री शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

 याबाबतची अधिक माहिती अशी की गुरुवारी संध्याकाळी अडवई सत्तरी येथील सर्वे क्रमांक 6/10 या जमीन क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात खैरीच्या झाडाची कत्तल झाली असून हा प्रकार बेकायदेशीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाळपई वनखात्याच्या यंत्रणेने शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन याबाबतचा पंचनामा केला होता. सदर जमीन स्वाती सतीश देसाई यांच्या मालकीचे असून यामध्ये सुमारे 19 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबतचा पंचनामा करून जप्त करण्यात आलेल्या मालाचा ताबा स्वाती सतीश देसाई यांच्याकडे देण्यात आला होता मात्र शुक्रवारी रात्री हा जप्त करण्यात आलेल्या माल गायब करण्याचा प्रकार एका पिकअपच्या माध्यमातून होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी यासंदर्भाची माहिती वनखात्याचे यंत्रणेला देण्यात आल्यानंतर फोंडा भरारी पथकाचे अधिकारी विश्वास चोडणकर व इतरांनी पहाटे सदर भागांमध्ये धाड घालून यामालाची वाहतूक करणारी पिकअप ताब्यात घेतली होती. त्याचप्रमाणे याप्रकल्पासाठी वापरण्यात आलेली मारुती गाडी जप्त करण्यात आली होती। शनिवारी दिवसभर यासंदर्भात तपास सुरू होता आज पुन्हा एकदा यासंदर्भात तपासाची प्रक्रिया पुढे नेण्यात आल्यानंतर मारुती गाडीच्या मालकाचा तपास लागला असून त्याचे नाव सगुण नाईक राहणार कुडाळ सिंधुदुर्ग असे आहे तर जप्त करण्यात आलेल्या पिकअप वरील नंबरचा मालक याचा शोध लागलेल्या नसून या पिकावर नमूद करण्यात आलेल्या क्रमांक हा पूर्णपणे बनावट असल्याचा शर्मा यांचा दावा आहे.

 यासंदर्भात एक खास पत्र वनखात्याकडून सिंधुदुर्ग वाहतूक खात्याला पाठविण्यात आले असून या वाहनाची सविस्तर माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे त्यांच्या अहवालानंतर पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून त्यानंतर खऱया अर्थाने याप्रकारासंदर्भात संशयितावर  कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे कुलदीप शर्मा यांनी स्पष्ट केले. दरम्यान जप्त करण्यात आलेला माल हा दीड लाखांचा नसून जवळपास पाच लाखांचा असण्याची शक्मयता कुलदीप शर्मा यांनी व्यक्त केली आहे .सदरची किंमत ही जवळपास दीड लाखांची असल्याचे नमूद केले असले तरी सदर दर 2008 च्या दरपत्रकानुसार असून सध्या झाडांच्या किमतीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून नवीन दरपत्रकानुसार जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत जवळपास पाच लाखाच्या आसपास असण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान सत्तरी तालुक्मयात अशा मोठय़ा प्रमाणात खैरीच्या झाडांची तस्करी उघडकीस आली असून दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारे काही झाडांची कत्तल केल्याची बाब उघडकीस आली होती.

Related posts: