|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » आयपीएल ऑक्शन ; भारतीय गोलंदाज चमकले,उनाडकटवर 8 कोटींची बोली

आयपीएल ऑक्शन ; भारतीय गोलंदाज चमकले,उनाडकटवर 8 कोटींची बोली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आयपीएलच्या बाराव्या हंगामात, दुसऱ्या फेरीमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला वरचष्मा गाजवला आहे. गतवषी सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत आलेल्या जयदेव उनाडकटला यंदाही राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाखांच्या बोलीवर आपल्या संघात कायम राखले आहे. याचसोबत मोहम्मद शमीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 4 कोटी 80 लाखांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामात खेळाडूच्या रुपात पंबईच्या संघाकडून पुनरागमन केलं आहे. वरुण ऍरोनला राजस्थान रॉयल्सने 2 कोटी 40 लाख तर मोहीत शर्माला चेन्नईने 5 कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे.

 

त्याआधी सुरुवातीच्या सत्रात व्ंिांडीजच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले आहे. विंडीजचे शेमरॉन हेटमायर, कार्लोस ब्रेथवेट आणि निकोलस पुरन यांच्यावर संघमालकांनी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. तुलनेने भारतीय खेळाडूंना पहिल्या सत्रात आपली छाप पाडता आली नाही. आपली मुळ किंमत 1 कोटी रुपयापर्यंत खाली आणुनही युवराज सिंहला संघात घेण्यात कोणत्याही मालकाने उत्सुकता दाखवलेली नाहीये. भारताच्या हनुमा विहारी आणि अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुक्रमे 2 कोटी आणि 5 कोटी रुपयांची बोली लावली आहे.

 

शिमरॉन हेटमायरला 4 कोटी 20 लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, टी-20 संघाचा कर्णधर कार्लोस ब्रेथवेटला 5 कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने तर यष्टीरक्षक निकोलस पुरनला 4 कोटी 20 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं आहे.

 

Related posts: