|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » बँक खाते आधार लिंक करणे ग्राहकांच्या इच्छेवर अंवलबून

बँक खाते आधार लिंक करणे ग्राहकांच्या इच्छेवर अंवलबून 

टेलिग्राफ ऍक्टच्या दुरुस्तीसाठी मंजुरी :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बँक खाते आणि मोबाईल नंबर यांना आधार लिंक करण्यासाठी कायद्याचा आधार देण्यासाठी केंद्रीय कॅबिनटेमध्ये दोन कायद्यात सुधारणा करण्यासाठी मंजुरी दिली आहे. टेलिग्राफ ऍक्ट आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिग ऍक्टला मान्यता दिली आहे. यात वैयक्तिक निर्णयावर आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडण्याचा अंतिम निर्णय त्या व्यक्तिवर आधारीत राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबरमध्ये लागू करण्यात आलेल्या आदेशावर आधार माहितीचा साठा खासगी कंपन्यांनी संग्रह करण्यास थांबवण्यात आले आहे. तर मोबाईल क्रमांक आधार जोडणी करणाऱया कायदा 57 हा रद्द करण्यात आला आहे. यात न्यायालयाने म्हटले आहे की यांची कोणतीही वैधता कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

 आधार कायद्यात बदल

कायद्यात बदल होणार वैयक्तीक माहिती चोरल्यास 10वर्षांपर्यत होणार शिक्षा

आधार नंबर सार्वजनिक होत असल्यास त्यासाठी वेगळे व्यासपीठ तयार करणार

आधार क्यूआर कोडच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन होणार

अठरा वर्षाखालील मुलाचे आधार तयार करण्यासाठी पालकांची सहमती आवश्यक