|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जीसॅट-7 ए मोहिमेसाठी इस्रो सज्ज, प्रक्षेपण आज

जीसॅट-7 ए मोहिमेसाठी इस्रो सज्ज, प्रक्षेपण आज 

चेन्नई

 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) स्वतःचा दूरसंचार उपग्रह जीएसएलव्ही-एफ11/जीसॅट-7ए शी संबंधित मोहिमेसाठी 26 तासांपर्यंत चालणारी उलटी गणना सुरू केली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटाला उलटी गणना सुरू झाली. श्रीहरिकोटाच्या दुसऱया प्रक्षेपणस्थळावरून बुधवारी अग्निबाण झेपावणार आहे. उपग्रहाला अंतराळात नेणारा अग्निबाण लाँचपॅडवरून बुधवारी संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी प्रक्षेपित होईल. मिशन रेडिनेस रिह्यू कमिटी आणि लाँच ऑथरायजेशन बोर्डाने 26 तासांची उलटी गणना सुरू केल्याचे इस्रोने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. जीएसएलव्ही-एफ11चे हे 13 वे उड्डाण असून सातव्यांदा ते स्वदेशी क्रायोनिक इंजिनासोबत प्रक्षेपित होणार आहे.

जीसॅट-7ए चे वजन 2,250 किलोग्रॅम असून हा उपग्रह कू-बँडमध्ये दूरसंचाराची सुविधा उपलब्ध करणार आहे. इस्रोचा हा 39 वा दूरसंचार उपग्रह असेल आणि भारतीय वायुदलाला उत्तम दूरसंचार सेवा पुरविण्याच्या उद्देशाने याचे प्रक्षेपण होत आहे.

Related posts: