|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कमलनाथ यांच्या उत्तर भारतीयांविरोधातील विधानाने गदारोळ

कमलनाथ यांच्या उत्तर भारतीयांविरोधातील विधानाने गदारोळ 

भोपाळ / वृत्तसंस्था

मध्यप्रदेशात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही, असे विधान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केल्याने प्रचंड गदारोळ उठला आहे. या विधानावर बिहार आणि उत्तर प्रदेशातील काँगेस नेत्यांनीही टीका केली आहे. तर काँगेस सत्ताकारणासाठी देशात फूट पाडत आहे, असा आरोप भाजपने केला.

ज्या उत्पादन केंदांमध्ये 70 टक्के स्थानिक कामगार असतील त्यांना करसवलत दिली जाईल, अशी घोषणा कमलनाथ यांनी केली. त्यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात हे उद्गार काढले होते. त्यावर या दोन्ही राज्यांमधील सर्वपक्षीय नेते तुटून पडले आहेत. समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, काँगेस आणि बसप या सर्व पक्षांच्या नेत्यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली.

कमलनाथ यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील कानपूर येथला आहे. त्यांचे शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले. त्यांचे उद्योग देशभर पसरलेले आहेत. अशा व्यक्तीच्या तोंडी उत्तर भारतीयांविरोधातील अशी विधाने शोभत नाहीत, अशी टिप्पणी भाजप नेते नरेंद्रसिंग तोमर यांनी केली. कैलाश विजयवर्गिय यांनीही त्याला पाठिंबा दिला.

Related posts: