|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा बँकेचे कर्मचारी आता ड्रेसकोडमध्ये

जिल्हा बँकेचे कर्मचारी आता ड्रेसकोडमध्ये 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा बँकेत कामानिमित्त आलेल्या ग्राहकांना कर्मचाऱयांची ओळख पटावी यासाठी सोमवारपासून बँकेने सोमवारपासून कर्मचाऱयांच्या ड्रेसकोडची अमलबजावणी सुरु केली. लेव्हेंड रंगातील ऍपलकट शर्ट आणि काळय़ा रंगातील फुल पॅन्ट, महिला कर्मचाऱयांसाठी भगव्या पदराची साडी देण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. आठवडय़ातून एक दिवस ड्रेसकोडसाठी सवलत देण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कर्मचाऱयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Related posts: