|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

ज्ये÷ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष होते.

जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते. रोज सकाळी रंकाळा तलावावर ते नियमित फिरायला येत असत. अलिकडील पाच, सहा वर्षे ते रंकाळा बचाव आंदोलनाचे आघाडीचे कार्यकर्ते बनले होते.

Related posts: