|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भारत-चीन यांच्यात सहकार्य वाढणार

भारत-चीन यांच्यात सहकार्य वाढणार 

10 स्तंभी कार्यक्रम आयोजनाची घोषणा  

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

 भारत आणि चीन यांनी एकमेकांशी असलेले सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी सविस्तर चर्चा केली. सहकार्यवृद्धीसाठी 10 स्तंभी सहकार्य कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक आदानप्रदान, चित्रपट निर्मिती आणि दूरदर्शन क्षेत्रात सहकार्य, वस्तूसंग्रहालय व्यवस्थापन सहकार्य, क्रीडा सहकार्य, युववर्ग सहकार्य, पर्यटन क्षेत्रात संयुक्त प्रयत्न, दोन्ही देशांमधील राज्ये आणि शहरे यांच्यात सहकार्य, पांरपरिक औषधोपचार पद्धतींचे आदानप्रदान, योगप्रसारात सहकार्य आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य असे हे दहा स्तंभ आहेत.

शुक्रवारी वांग यांचे दिल्लीत आगमन झाले. त्यांनी दुपारी स्वराज यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी रितीने पार पडली अशी प्रशंसा वांग यांनी केली. चीनमधील वुहान येथे मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली होती. त्याच चर्चेच्या आधारावर हा 10 स्तंभी कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे दोन्ही देशांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधली सांस्कृतिक सहकार्यवृद्धी कार्यक्रम हा ऐतिहासिक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन वांग यांनी केले.

Related posts: