|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हिंदकेसरी आंदळकरांचा बंगल्यात चोरी

हिंदकेसरी आंदळकरांचा बंगल्यात चोरी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

rयेथील रमणमळा परिसरातील छत्रपती कॉलनीमधील दिवंगत हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांच्या बंद बंगला चोरटय़ांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडला. सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. बंगल्याच्या हॉलमध्ये चोरटय़ांनी प्रवेश न केल्याने आंदळकर यांची मानाची गदा आणि अनेक मेडल्स सुरक्षित राहिले आहेत. याच बंगल्यात एक वर्षापूर्वी चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला होता.

     रमणमळा परिसरातील छत्रपती कॉलनीमधील बंगल्यामध्ये आंदळकर यांचे नातेवाईक राहतात. ते पुणे येथे गेले होते. चोरटय़ांनी किचन खोलीचा लाकडी दरवाजा मोडून बंगल्याच्या प्रवेश केला. तीन बेडरुममधील पाच लोखंडी तिजोऱया आणि लाकडी कपाट फोडले. सुमारे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास केले.  तिजोरी आणि कपाटातील सर्व साहित्य रुममध्ये सर्वत्र विस्कटून टाकून टाकले होते. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण केले. श्वान बंगल्यापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर जावून घुटमळे. चोरटय़ांनी तेथून पुढे वाहनातून पलायन गेले असावे, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. दोन ठिकाणी चोरटय़ांच्या हाताचे ठस्से मिळून आले आहेत. यावरुन पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा दिवसभर शोध घेतला जात होता.

आंदळकर यांच्या बंगल्यात वर्षभरापूर्वी चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला होता. यानंतर चोरटय़ांनी पुन्हा एकदा याच बंगल्यात चोरी केली.

Related posts: