|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

मुंबईत दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :  

 

मुंबईतील गोरेगावमध्ये बांधकाम सुरु असलेली दुमजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळती समोर येत आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे.

गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात बांधकाम सुरु असलेली इमारत सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास कोसळली. यामध्ये 27 वर्षीय रमन कुमार आणि इतर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे कर्मचारी गोरेगावात पोहचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.