|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » सिद्धार्थ जाधवने बीडच्या 85 अनाथ मुलांना केली मदत

सिद्धार्थ जाधवने बीडच्या 85 अनाथ मुलांना केली मदत 

महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिध्दार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेहऱयावर हसू फुलवत असतो. पण या मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतेच दाखवून दिलेय. नुकत्याच एका कार्यक्रमात सिध्दार्थने बीडच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेहऱयावरही आनंद फुलवण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.

14 वर्षांपूर्वी सहारा अनाथालयाची स्थापना करून अनेक उपेक्षित आणि वंचित मुलांना घर मिळवून देणाऱया संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. तेव्हा संतोषने मनमोकळे करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच सिध्दार्थने सर्वांसमक्ष धनराशी देण्याचे जाहीर केले. अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, बीडच्या पाटसरा या दुर्गम खेडय़ातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा मला अभिमान आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून तो अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी काम करतो. त्याच्या सहारा अनाथालयात 85 निराधार मुले आहेत. या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला. इतकेच म्हणेन. जी मी धनराशी दिली, ती संतोषच्या कार्यापुढे फार छोटी होती.

Related posts: