|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सार्वजनिक बांधकाम विभागात झाड कोसळले

सार्वजनिक बांधकाम विभागात झाड कोसळले 

पार्किंगच्या पत्र्याचे शेडचे नुकसान

प्रतिनिधी/सातारा

येथील पोवईनाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात असलेले झाड आज दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने काही थरार निर्माण झाला. हे बांधकाम विभागाच्या परिसरात असलेल्या पार्किंगच्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने शेडचे नुकसान झाले आहे. तर शेडच्या पुढे उभ्या असलेल्या कारवर झाडाच्या फांद्या कोसळल्याने कारचेही नुकसान झाले आहे.

दुपारी 3 च्या दरम्यान पोवईनाक्यावरील रेणुका पेट्रोल पंपासमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात एक झाड अचानक कोसळले. हे झाड आवारातील गाडया पार्किंगच्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने शेडचे नुकसान झाले तर शेडच्या पुढे दोन कार उभ्या होत्या व त्यापुढे एक बुलडोझरवर झाडाच्या पुढील भाग कोसळला. यामध्ये एका कारच्या बॉनेटवर फांदी पडल्याने बॉनेटचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने परिसरात मोठी वर्दळ नव्हती. तसेच पार्किंग शेडपुढे उभ्या असलेल्या कारमध्येही कोणी नव्हते. त्यामुळे जीवीतहानी झाली नाही. या झाडाचा बुंधा कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हे झाड पडले. मात्र, झाडाची अशी अवस्था असूनही त्याकडे बांधकाम विभागाच्या कोणाचेही लक्ष नव्हते. अखेर हे झाड बुंध्यापासून अचानक कोसळले आणि पार्किंग शेडवर कोसळले. सुदैवाने यामध्ये फार मोठे नुकसान व इतर दुर्दैवी घटना घडली नाही.

Related posts: