|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पालकांनी पाल्याच्या मानसिकतेचा विचार करावा

पालकांनी पाल्याच्या मानसिकतेचा विचार करावा 

वार्ताहर /मांजरी :

पालकांनी पाल्याबाबत आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. त्यांना सुसंस्कृत करून उत्तम नागरिक बनविणे आपले कर्तव्य आहे. हे लक्षात घेतले पाहिजे, असे विचार प्रियदर्शनी कोरे यांनी मांडले. अंकली येथील बाळासाहेब शिरशेट कन्नड माध्यम प्राथमिक शाळेच्या पालक सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा शिरशेट उपस्थित होत्या. संचालिका सविता कोकणे, स्मिता कराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरेखा शिरशेट म्हणाल्या, शालेय जीवनात विद्यार्थ्याला उत्तम संस्कार व चांगले शिक्षण यांची गरज असते. यासाठी पालकांनी जागरुक असले पाहिजे. पालकांनी मुलांना मनोरंजनात्मक साधनांपासून दूर ठेवून त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवले पाहिजे. प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया असतो. यामुळे हा पाया भक्कम करण्याची जबाबदारी पालकांची आहे. संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत असून यासाठी पालकांनीही आपले कर्तव्य उत्तमरित्या पार पाडले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एम. कुंभार यांनी स्वागत केले. आर. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन तर एस. सी. असोदे यांनी आभार मानले.