|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारातील घटक पक्षांनी खाण प्रश्नावर सरकारवर दबाव टाकावा

सरकारातील घटक पक्षांनी खाण प्रश्नावर सरकारवर दबाव टाकावा 

प्रतिनिधी /कुडचडे :

गोव्याती खनिज व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. खनिज प्रश्न सोडविण्यास सरकारला पूर्ण अपयश आले असून या प्रश्नावर आत्ता सरकारातील घटक पक्षांनीच दबाव टाकला पाहिजे. फोमेन्तो कंपनीने कामगारावर अन्याय केला आहे. तोही दूर करण्यासाठी घटक पक्षांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

काल सोमवारी सुभाष वेलिंगकर यांनी व गोवा सुरक्षा मंचच्या इतर पदाधिकाऱयांनी कुकुड्डेगाळ येथील फोमेन्तो कंपनीद्वारे अन्याय झालेल्या कामगारांनी उपोषण सुरू केलेल्या ठिकाणी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी श्री. वेलिंगकर बोलत होते. काल या आंदोलनाचा 36व्या दिवशी होता.

खाण बंदीमुळे जनतेवर मोठे संकट आले आहे. तसेच खाण अवलंबिताना सरकारने दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत, ती अंगलट आली आहेत. सरकार खाण अवलंबिताना फक्त तारखाच देत आले आहेत व अजूनही देत आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दि. 22 डिसेंबरला खांडेपार येथे पुलाच्या उद्घाटना दिवशी खाण अवलंबितांनी काळे झेंड दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण या अवलंबितांना विश्वासात घेऊन सदर आंदोलन तात्पुरतो स्तगीत ठेवा व दि. 27 रोजी यावर सर्वांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन सरकारने पुन्हा एकदा दिले आहे. यावरून दिसून येत आहे की, सरकारने जनतेवर उपाशी पडण्याची वेळ आणली आहे. ठोस निणर्य न घेता, केवळ आश्वासने देण्यावरच जास्त भर दिला जात आहे.

फोमेन्तो कामगारांना ज्यांना 2015 साली कंपनीने विश्वासात न घेता अचानक कामावरून काढून टाकले. तद्नंतर न्याय मिळण्यासाठी कामगारांनी मंत्री, आमदार, सरकार तसेच न्यायलयात धाव घेतली. पण, हा प्रश्न निकालात काढण्यासाठी सरकारने जातीने लक्ष घातलेले नाही. याची नोंद सरकार स्थापन करण्यासाठी ठेका दिलेल्या घटक पक्षांनी घेत, हा मुद्दा घेऊन जनतेच्या कल्याणासाठी सरकारवर दबाव टाकावा व हा प्रश्न सोडविण्यासाठी जोर धरावा.

Related posts: