|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय वंशाचे राजेश सुब्रमण्यम फेडेक्स कंपनीच्या अध्यक्षपदी

भारतीय वंशाचे राजेश सुब्रमण्यम फेडेक्स कंपनीच्या अध्यक्षपदी 

हय़ूस्टन :

मूळचे भारतीय असणारे राजेश सुब्रमण्यम वय (52) यांची मल्टीनॅशनल कोरियन कंपनी फेडेक्स एक्स्प्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. सध्या राजेश हे फेडेक्स कॉर्पोरेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष, मुख्य मार्केटीग आणि कम्युनिकेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर नवीन वर्षात कंपनीची नवीन जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजेश यांचा जन्म केरळमध्ये झाला असून त्यांनी आयआयटी बॉम्बे या ठिकाणी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तर न्यूयॉर्कमध्ये सायरान्यूज विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजीनिअरिंगमधील मास्टर पदवी मिळवली आहे.

राजेश हे मागील 27 वर्षापासून फेडेक्स समूहाशी जोडले गेले आहेत. तर 2013 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. फेडेक्सचे प्रमुख आणि सीईओ डेव्हिड ब्रॉनजेकने म्हटले आहे की राजेश यांना जागतिक पातळीवरचा असलेल्या अनुभवाचा विचार करुनच त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.