|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुंभमेळय़ाला 15 कोटी भाविक उपस्थित राहणार

कुंभमेळय़ाला 15 कोटी भाविक उपस्थित राहणार 

प्रतिनिधी /पणजी :

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 15 जानेवारीपासून सुरु होणाऱया कुंभमेळय़ाला यंदा 14 ते 15 कोटी भाविकांची उपस्थिती असेल. उत्तर प्रदेश सरकारने या मेळय़ाची जय्यत तयारी केली असून 700 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूकमंत्री नंदगोपाल गुप्ता यांनी काल गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रयागराज येथे 15 जानेवारी ते 4 मार्च या कालावधीत हा कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळय़ाची तयारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मागील दीड वर्षापासूनच सुरु केली आहे. भव्य अशा पद्धतीने कुंभमेळय़ाचे आयोजन करण्यावर सरकारने भर दिला आहे. 3200 हेक्टर भागात कुंभमेळय़ाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच कुंभमेळय़ाचा लोगो तयार करण्यात आला आहे. युनोस्कोने या मेळय़ाला मोठा सांस्कृतिक सोहळा म्हणून मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

महाशिवरात्रीला होणार मेळय़ाची सांगता

नवीन विमानतळासह अन्य अनेक महत्वपूर्ण सुविधा या मेळय़ासाठी तयार करण्यात आल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱयांसोबत चर्चा करून आयोजन कसे असावे याबाबत सूचना केल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचेही सहकार्य या मेळय़ास लाभले आहे. 15 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी पुंभ मेळय़ाला सुरुवात होणार आहे. 4 फेब्रुवारीला शाही स्नान होणार आहे. 4 मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी मेळय़ाची सांगता होणार आहे. 49 दिवस कुंभ मेळा चालणार आहे. पारंपरिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा यावेळी संगम दिसून येणार आहे. केंद्र सरकारची पाच खाती आणि उत्तर प्रदेश सरकारच्या अनेक खात्यांचा यामध्ये सहभाग आहे.

Related posts: