|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » आनंद संघातर्फे वॉकेथॉनचे आयोजन

आनंद संघातर्फे वॉकेथॉनचे आयोजन 

पुणे / प्रतिनिधी :

आनंद संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘# बी द चेंज वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले असून, 6 जानेवारीला सावित्रीबाई फुले विद्यापीठापासून याची सुरुवात होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महिला रग्बी टीमच्या कप्तान वाहबिज भरूचा यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आनंद पुणे व ग्रामीण विभागाचे डायरेक्टर डॉ. आदित्य गाइत यांनी दिली. याप्रसंगी डॉ अमर अग्रवाल, वाहबिज भरूचा आदी उपस्थित होते. वॉकेथॉनचा मुख्य उद्देश नागरिकांना चालण्याबाबत प्रोत्साहित करणे तसेच आरोग्याचे महत्त्व पटवून देणे, असा आहे. या वॉकेथॉननंतर मोफत योगाची कार्यशाळा भरविण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.