|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नागेवाडीत शनिवारी जंगी कुस्ती मैदान

नागेवाडीत शनिवारी जंगी कुस्ती मैदान 

नामवंत मल्ल कै. नानासाहेब निकम यांच्या स्मरणार्थ कुस्ती मैदानाचे आयोजन

प्रतिनिधी/ विटा

खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे शनिवारी 5 जानेवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता कै. पै. नानासाहेब महादेव निकम यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती मैदानाचे उद्घाटन प. पु. रमेशजी महाराज कदमवाडीकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आ. अनिल बाबर, आ. विश्वजीत कदम, आ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षिरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, साळशिंगेचे उद्योजक ईश्वर जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सतिश निकम यांनी दिली.

याबाबत तालुकाध्यक्ष निकम यांनी सांगितले, नागेवाडी येथे पै. नानासाहेब महादेव निकम यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जानेवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता मैदानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या मैदानात महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख विरूद्ध भारत केसरी पै. सुशिलकुमार, पै. सिकंदर शेख आणि नाथा पालवे या प्रमुख दोन कुस्त्या होणार आहेत.

पै. नवनाथ इंगळे आणि पै. शरद माने, पै. विकास पाटील आणि पै. किशोर पाटील, पै. अक्षय कदम आणि पै. वैभव रास्कर, पै. अभिजीत मोरे आणि पै. सुरज मदने, पै. भारत लोकरे आणि पै. संदिप बोराटे, पै. अमर गाढवे आणि पै. अभिषेक देवकर, पै. खाशाबा मदने आणि पै. अमोल नरळे, पै. सागर तामखडे आणि पै. अनिकेत मोटे, पै. ओंकार मदने आणि पै. कुमार पाटील, पै. सागर सूर्यवंशी आणि पै. सतिश पवार, पै. दशरथ तामखडे आणि पै. समीर शेख, पै. राहुल सुडके आणि पै. अमर पाटील यांच्यात कुस्त्या रंगणार आहेत.

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकार भैय्यासाहेब उर्फ अजिंक्य गायकवाड आणि निलम काकी उर्फ मंजुषा कतरी हे या मैदानाचे प्रमुख आकर्षण आहेत. कुस्ती नोंदणी सकाळी 11 ते 2 या वेळेत कुस्ती आखाडय़ाजवळ करण्यात येणार आहे. नंतर कुस्ती नोंदली जाणार नाही. कुस्ती नोंदणीसाठी बबन निकम यांच्याशी संपर्क साधावा, असेही तालुकाध्यक्ष निकम यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, बापूशेठ पाटील, सुखदेव पाटणकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असे निकम यांनी सांगितले. मैदानाचे संयोजन महेश निकम, हणमंत निकम, बापूराव पाटील, दर्शन निकम, विश्वजीत यादव, शहाजी निकम, राजकुमार निकम, शिवाजी निकम, राजेंद्र निकम, सुशिलकुमार निकम, संजय निकम, आप्पासो निकम, शंकर निकम, आप्पासो शंकर निकम, जीवन निकम, प्रशांत निकम, सचिन निकम, सागर निकम, पृथ्वीराज निकम, सुभाष निकम, सनी शिंदे, सुरज इनामदार, नवेद मुजावर, प्रशांत पाटील, रोहीत बाबर, ओंकार रसाळ, विजय यादव, रमेश यादव यांनी केले आहे.