|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हा रुग्णालय रत्नागिरीचा शस्त्रक्रिया विभाग, राष्ट्रीय स्तरावरील तपासणासाठी पात्र

जिल्हा रुग्णालय रत्नागिरीचा शस्त्रक्रिया विभाग, राष्ट्रीय स्तरावरील तपासणासाठी पात्र 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूती विषयक सेवांची गुणवत्ता वाढवणे व गरोदर मातांना आदरपूर्ण देखभाल, प्राप्त व्हावा यासाठी, केंद्र शासनाकडून ‘लक्ष्य’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात आला. प्रसुती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रिया विभाग या दोन्ही विभागांना, मानांकनासाठी, गुणवत्तेच्या निर्धारित केलेल्या विशिष्ट कसोटय़ांवर किमान 65 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.  यामध्ये रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग 80 टक्के गुण प्राप्त करत राष्ट्रीय स्तरावरील तपासणासाठी पात्र ठरला आहे.

या सेवांचे परीक्षण सर्वप्रथम संबंधित संस्थेच्या स्तरावर करण्यात येते, त्यात 65 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केल्यास राज्यस्तरीय तपासणी करण्यात येते, त्यातही 65 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केल्यास, मानांकनासाठी राष्ट्रीय स्तरावर तपासणी करण्यात येते. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथील शस्त्रक्रिया विभागाची 27 डिसेंबर 2018 रोजी सांगली येथील अधिकाऱयाच्या राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत 82 टक्के इतके गुण प्राप्त करुन जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथील शस्त्रक्रिया विभाग, राष्ट्रीय स्तरावरील तपासणीसाठी पात्र ठरला आहे. 

लक्ष्य अंतर्गत विविध 8 घटकांची सविस्तर तपासणी करण्यात येते. यामध्ये सेवा पुरवठा, रुग्णांचे अधिकार, उपलब्ध संसाधने, सहाय्यक सेवा,  चिकित्सालयीन सेवा,  संसर्ग व्यवस्थापन, गुणवत्ता व्यवस्थापन, परिणाम हे आठ घटक तपासण्यात येतात.

 

Related posts: