|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना भेटल्या मुफ्ती

मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना भेटल्या मुफ्ती 

श्रीनगर

 दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ात शनिवारी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी मारले गेले होते. या घटनेनंतर रविवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. मुफ्ती यांच्या या कृतीला आगामी निवडणुकीशी जोडून पाहिले जात आहे. एखादा हल्लेखोर असल्यास त्याच्या बहिणीची कोणती चूक आहे? तिचे कपडे उतरविण्यात आले तसेच तिला मारहाण करण्यात आली. पोलीस अधिकाऱयांनी केलेले हे कृत्य गुन्हाच आहे. अशाचप्रकारे दोन जणांना जबर मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांसोबत तुमचे भांडण असल्यास त्याच्यासोबत संघर्ष करा, परंतु त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि बहिणीसोबत असे वर्तन सहन केले जाणार नसल्याचे राज्यपालांना सांगू इच्छिते असे उद्गार मुफ्ती यांनी काढले आहेत. पुलवामाच्या हंजन भागात सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे सर्व मृत दहशतवादी पुलवामाचे रहिवासी होते.

Related posts: