|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews » ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे काल 31 डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरफराज याने सांगितले की, माझ्या वडिलांनी काल 31 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता ( कॅनडाच्या प्रमाणवेळेनुसार) अंतिम श्वास घेतला. दुपारी ते कोमात गेलेत आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गत 16 ते 17 आठवड्यांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. आमचे अख्खे कुटुंब कॅनडात आहे. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर कॅनडात अंत्यसंस्कार होतील.

कादर खान हे प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सी या आजाराने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. 22 ऑक्टोबर 1937 रोजी जन्मलेल्या कादर यांनी 1973 मध्ये ‘दाग’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्द सुरु केली होती. यात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी रणधीर कपूर व जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी कादर खान यांनी संवाद लेखन केले होते. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी अनेक पटकथा लिहिल्या. मनमोहन देसाई यांच्यासोबत मिळून कादर खान यांनी धर्मवीर, गंगा जमुनी सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर अँथोनी आदी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. तर मेहरा यांच्यासोबत मिळून ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले. त्यामुळे अभिनेता, संवाद लेखक शिवाय पटकथा लेखक अशी कादर खान यांची ओळख होती. कादर खान यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले आणि 250 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले.

Related posts: