|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुलाचे उद्घाटन अडवूनच दाखवावे

पुलाचे उद्घाटन अडवूनच दाखवावे 

प्रतिनिधी/ पणजी

मांडवी पुलाच्या उद्घाटनावरून काँग्रेस पक्ष लोकांना विनाकारण चिथावत असून सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. काँग्रेस पक्ष आणि त्याचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उद्घाटनाच्या प्रश्नावरून अकारण टीका चालविली असून चोडणकर यांनी उद्घाटन अडवूनच दाखवावे, असे आव्हान पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी दिले आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचीही उपस्थिती होती. तिसऱया मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी 12 जानेवारीपर्यंत या पुलाचे बहुतेक काम पूर्ण होणार, असा दावा कुंकळकर यांनी केला.

अपूर्ण पुलाचे उद्घाटन करणार नाही

दिल्लीत 10 ते 12 जानेवारी असे तीन दिवस भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक असल्यामुळे पुलाचे उद्घाटन 12 जानेवारी नंतरच होणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपतर्फे देण्यात आले आहे. भाजपने अपूर्ण पुलाचे-रस्त्यांचे उद्घाटन कधीच केलेले नाही आणि करणारही नाही. मांडवी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच त्याचे उद्घाटन होणार आहे, असे कुंकळकर म्हणाले.

काँग्रेसनेच केली अर्धवट बांधकामे

1971 मध्ये काँग्रेसने बांधलेला मांडवी पूल 15 वर्षांतच कोसळला होता. काँग्रेसच्याच काळात गवंडाळी व नेवरा पूल बांधण्यात आले, पण त्यांना जोडरस्तेच नव्हते. अशी अनेक अर्धवट कामे भाजप सरकारने पूर्ण केली, असेही ते म्हणाले.

मांडवी पुलावर आतापर्यंत 483 कोटी खर्च

सध्या तिसऱया मांडवी पुलासाठी 1000 कामगार आणि 50 अभियंते राबत आहेत. आतापर्यंत त्या पुलाचा खर्च 483 कोटी एवढा झाला असून त्यातील अर्धी रक्कम केंद्र सरकार देणार आहे. जुवारी पूल 6 महिन्यात करण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. परंतु शेवटी काहीच झाले नाही. भाजप सरकारच्या काळातच अनेक पूल-रस्ते यांची बांधकामे होऊन खऱया अर्थाने गोव्याचा विकास झाला.

वीज कंत्राटात कोणताच घोटाळा नाहाr

दरम्यान, तिसऱया मांडवी पुलावरील वीज पुरवठा आणि खांब उभारणी यांचे काम त्याच कंपनीला देण्यात आले असून त्यात कोणताच घोटाळा झालेला नाही, असा खुलासा कुंकळकर यांनी केला.

Related posts: