|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘वनदेवतेच्या प्रांगणात’ पुस्तकाचे प्रकाशन

‘वनदेवतेच्या प्रांगणात’ पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी/ पणजी

पिरोज नवनाथ नाईक लिखित धालो लोकगीतांवर आधारित ‘वनदेवतेच्या प्रांगणात’ पुस्तकाचे प्रकाशन दि. 30 डिसेंबर रोजी सावईवेरे येथे करण्यात आले.

यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, प्रमुख वक्त्या पोर्णिमा केरकर, मुख्यमंत्र्यांचे खास सचिव सीताराम नाईक, वेरे वाघुर्मेचे सरपंच सत्यवान शिलकर उपस्थित होते.

लेखक समाजाचा खराखुरा आरसा असतो. माणसाने कसे जगावे हे आपण पुस्तकातून शिकू शकतो. या पुस्तकातून लेखिकेने आपला प्रदिर्घ अनुभव, परंपरा, आद्य संस्कृती टिकवण्याचा व कला संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संशोधकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल, असे मंत्री गावडे यांनी सांगितले. 

या पुस्तकाच्या लेखिकेने पुस्तकाचा समृद्ध असा अभ्यास केला असून उत्कृष्ट संकलन, विश्लेषण व समृद्ध असे आकर्षक पुस्तक वाचकांसमोर ठेवले आहे. वनदेवतेच्या प्रांगणात या पुस्तकातून लोकगीते जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखिकेने तळमळीने काम केल्याचे दिसून येते. हे पुस्तक लोककलेचा, समाजाचा, परंपरेच। पर्यावरणाचा व भाषेचा अभ्यास करणाऱयांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल, असे राजेंद्र केरकर म्हणाले.

या पुस्तकात सावईवेरे गावातील मधल्यावाडय़ावरील धालोत्सवाच्या पाच रात्रीचा सांस्कृतिक इतिहास आहे. आपल्या माती आणि संस्कृतीपासून दूर पोहोचू पाहणाऱया नव्या पिढीला हे पुस्त्क निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असे पौर्णिमा केरकर म्हणाल्या.

लेखिका पिरोज नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सीताराम नाईक, सत्यवान शिलकर यांनी विचार मांडले. स्वागत प्राजक्ता नाईक यांनी केले तर नवनाथ नाईक यांनी आभार मानले.