|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » वडिलांच्या निधनानंतर राशिद मैदनात उतरला अन् सामना जिंकला

वडिलांच्या निधनानंतर राशिद मैदनात उतरला अन् सामना जिंकला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अफगाणिस्तानचा फिरकीपटू आणि टी-20 क्रमवारीमध्ये नंबर एकवर असलेल्या राशिद खानच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतरही राशिद खान मैदानावर उतरला आणि दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

 

आयसीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपल्या अनोख्या शैलीने मैदानावर फलंदांना पळता भूई करणारा अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतरही राशिद बिग बॅश लीगमधील सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला. सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना राशिदने दोन बळी घेत संघाला 20 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड स्ट्रायकर्सने 20 षटकांत 4 बाद 175 ठोकल्या होत्या. यानंतर राशिद खानच्या गोलंदाजीसमोर सिडनीचा संघ 20 षटकात फक्त 6 बाद 155 धावा करू शकला आणि ऍडलेड स्ट्रायकर्सने 20 धावांनी विजय मिळला. वडिलांच्या निधनानंतर राशिद खान भावूक झाला. ‘आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला गमावले आहे. ते म्हणजे माझे वडील. तुम्ही नेहमी मला खंबीर राहायला सांगत का होते, ते मला आज उमगले,’ असे त्याने ट्वटिमध्ये म्हटले आहे.