|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Automobiles » नववर्षात ग्राहकांसाठी मारूतीकडून नवी गाडी, पहा फर्स्ट लूक

नववर्षात ग्राहकांसाठी मारूतीकडून नवी गाडी, पहा फर्स्ट लूक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणजे मारुती सुझुकी. ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना अत्याधुनिक आणि सोयीयुक्त गाड्या कशा देता येतील हाच विचार ऑटोमोबाईल कंपनीचा असतो. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेक जणांचा ओढा गाडी घेण्याकडे असतो. जर तुम्ही गाडी घेण्याच्या विचारात असाल तर, एकदा या गाडीची चाचणी घ्याच. मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री झालेल्या वॅगन आर गाडीचे येत्या 23 जानेवारीला नव्या रुपात अनावरण होणार आहे.

ही नवी गाडी अत्याधुनिक आहे. सोबतच या गाडीत नव्या सुविधा आहेत. या गाडीचे नवे रुप अगदी वेगळे आहे. आधीच्या वॅगन आरच्या तुलनेत नव्या गाडीत अनेक बदल केले आहेत. नवी गाडी जुन्या गाडीच्या तुलनेत आकाराने मोठी आहे. नव्या गाडीची चाचपणी भारतात सुरु आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील बाजारात येणारी ‘वॅगन आर’ ही तिसऱ्या पिढीतील गाडी आहे. या गाडीची विक्री जपानमध्ये होत आहे. भारतात सद्यस्थितीत ज्या वॅगनआर गाड्या आहेत, त्या दुसऱ्या पिढीतील आहेत.