|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवबा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सविता शिंदे यांची निवड

शिवबा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सविता शिंदे यांची निवड 

वार्ताहर /शाहूपुरी :

शिवबा संघटना महाराष्ट्र यांची नुकतीच सातारा येथे बैठक झाली, यामध्ये सातारा जिह्याचे खासदार उदयनराजे भोसेले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सविता शिंदे यांची शिवबा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सविता शिंदे या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, महिलांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना ड्रेस व खाऊ वाटप, असे विविध सामाजिक उपक्रम सातारा जिह्यात त्या सतत राबवित असतात. या सामाजिक कार्याची दखल घेत सविता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

 यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज जरांगे पाटील, गणेश शिंदे, प्रदेशाध्यक्ष देविदास पाटील पाठे, संपर्क प्रमुख राजेद्रं जराद, बाबू वालेकर, अमोल खुणे, गणेश खुणे, रावसाहेब बोरढे, उपप्रेदशाध्यक्ष, योगेश घोडके, युवक प्रदेशाध्यक्ष विजय काकडे आदी उपस्थित होते.

 

Related posts: