|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » ‘ठाकरे’ सिनेमासाठी दोन चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलणार ?

‘ठाकरे’ सिनेमासाठी दोन चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलणार ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सिम्बा आणि भाई यांचा वाद ताजा असताना मराठी मनाला सुखावणारी बाब घडली आहे. येत्या 25 जानेवारीला अभिजीत पानसे दिग्दर्शित ’ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी प्रदर्शित होणाऱया शौमिक सेन दिग्दर्शित ‘चिट इंडिया’ चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

ही पत्रकार परिषद ’चिट इंडिया’ची असली तरी त्या व्यासपीठावर खासदार व ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘ठाकरे’ चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता पाहता बहुचर्चित मणिकर्णिका हा चित्रपटही आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 25 जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ आणि ‘चिट इंडिया’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. मात्र ‘ठाकरे’साठी ‘चिट इंडिया’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.