|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शाहूवाडीत जुगार अड्डय़ावर छापा

शाहूवाडीत जुगार अड्डय़ावर छापा 

प्रतिनिधी/ शाहूवाडी

 शाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच अवैध मद्य तस्करांवर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळणारे नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर शाहुवाडी   पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. त्यानुसार सहकाऱयांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय 35, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय 35, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय 31, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय 51, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय 35, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय 32), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय 40, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय 33, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय 45, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) यांच्यावर कारवाई केली. रोख 52,550 रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर मारुती स्विफ्ट कार, कमांडर जीप या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले

 

=मद्य तष्करावर ही कारवाई

 दरम्यान शेंबवणे-मलकापूर रस्त्यावर गुरववाडी गावाजवळ मोटारसायकलवरून अवैधरित्या मद्य वाहतूक करताना आढळलेल्या दोघा आरोपींना शाहूवाडी पोलिसांनी शनिवारी पहाटे तीन वाजता अटक केली. सचिन आनंदा कळंत्रे (वय 27, रा. करुंगळे, ता. शाहूवाडी) व आकाश बबन कांबळे (वय 23, रा. ओकोली, ता. शाहूवाडी) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. यावेळी पोलिसांनी 11 हजार 564 रुपये किंमतीचे बेकायदेशीर गोवा बनावटीचे मद्य व मोटारसायकल मिळून 72 हजार 574 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डीवायएसपी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व शाहुवाडीचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शशिकांत गिरी, हेडकॉन्स्टेबल विश्वास चिले, चिंतामण बांबळे, धनाजी सराटे, अभिजित उरूणकर, सागर कुंभार, बी. जी. मोळके, वाहनचालक माळी व शिवाजी शिंदे आदींच्या पोलीस पथकाने दोन्ही कारवाई केल्या.