|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » औषध साठाप्रकरणी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी दोषी

औषध साठाप्रकरणी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी दोषी 

प्रतिनिधी/ खेड

शेतकऱयांच्या दुभत्या जनावरांसह शेळी व जनावरांच्या संवर्धन तसेच विविध आजारांचे निदान करण्यासाठी शासनाकडून पुरवण्यात येणाऱया लाखो रूपयांच्या औषधांचा साठा करून विक्री करत मुदतबाहय़ औषधसाठा केल्याप्रकरणी तुंबाड येथील सहाय्यक पशुधन अधिकारी आर. एस. जाधव दोषी असल्याचे चौकशी अहवालाअंती निष्पन्न झाले आहे. या बाबतचा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे सादर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

खाडीपट्टय़ातील तुंबाड गावासह पंचक्रोशीतील गावांसाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिसरातील शेतकऱयांच्या दुभत्या जनावरांसह त्यांच्या आजारांचे निदान करण्याबरोबरच लसीकरणासाठी औषधे पुरवली जात होती. मात्र ही औषधे तुंबाड येथील गुरांच्या दवाखान्यात न नेता शिव फाटा येथे भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गाळय़ामध्ये साठा करून ठेवली होती.

मुदतबाहय़ साठा करून ठेवण्यात आलेल्या औषधांची दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त करत या बाबत पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडे रितसर तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत येथील पशुवैद्यकीय अधिकारी विनया जंगले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मुदतबाहय़ औषधांचा साठा केलेला गाळा सील केला होता. या बाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱयांकडे पाठवण्यात आला होता. प्राप्त झालेल्या गोपनीय अहवालानुसार, मुदतबाहय़ औषधांचा साठा केल्याप्रकरणी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी आर. एस. जाधव दोषी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे. 

..

Related posts: