|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » २०१९ मधील पहिले ग्रहण आज

२०१९ मधील पहिले ग्रहण आज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

या वर्षी 3 सूर्यग्रहणे, आणि 2 चंद्रग्रहणे होणार आहेत, त्यातील पहिले ग्रहण 6 जानेवारीला होणार असून  हे पहिले ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आहे.
21 जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण असेल, त्यानंतर 2 जुलै रोजी खग्रास सूर्यग्रहण असेल, ही तीनही ग्रहण भारतातून दिसणार नाहीत. 17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण असेल, ते भारतातून दिसेल. त्यावेळेस मान्सूनचे दिवस असल्यामुळे ते कितपत दिसेल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.  26 डिसेंबर रोजी सूर्यग्रहण आहे, ते कंकणाकृती ग्रहण असेल. हे ग्रहण भारताच्या दक्षिण पट्ट्यातून दिसेल.