|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » समाजहितासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे

समाजहितासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे 

वार्ताहर / व्हनाळी

समाजातील विविध प्रश्नांची मांडणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून करून त्या प्रश्नांना न्याय हक्क देण्यासाठी पत्रकार हा नेहमीच प्रयत्नशील आसतो. शिवाय लोकशाहीचा चाथा स्तंभ म्हणून समाजात पत्रकारांची ओळख आहे. समाजाच्या हितासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पत्रकार शिवाजीराव पाटील यांनी केले.

केनवडे फाटा ता,कागल येथे कागल तालुका ग्रामिण पत्रकारांच्या वतीने  6 जानेवारी पत्रकार दिनानिमत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बाबूराव असबे होते.

यावेळी आचार्य बाळशास्त्राr जांभेकरांच्या प्रतिमेचे पुजन बाबुराव असबे,शिवाजी पाटील यांच्या हस्ते पत्रकारांच्या उपस्थीत करण्यात आले.

यावेळी पत्रकार प्रकाश कारंडे म्हणाले,दर्पणकार आचार्य बाळशास्त्राr जांभेकर यांनी सुरू केलेल्या या पत्रकारितेची वाटचाल सर्वच पत्रकारांनी  प्रामाणिकपणे पुढे सुरू सुरू ठेवली आहे. शिवाय शासन दरबारी पत्रकारांच्या विविध योजना ह्या आदी स्विकृती असणा-या कांही मोजक्याच पत्रकारांना मिळतात त्यामध्ये ग्रामिण भागातील काम करणा-या पत्रकारांचाही समावेश व्हावा अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकार दिनानिमित्त केली.

यावेळी पत्रकार रमेश पाटील यांनी मनोगतात पत्रकारितेमधील विविध अडचणी व आवाहने यासंदभार्त माहिती देवून पत्रकारदिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.  

कार्यक्रमास पत्रकार डि.एच.पाटील (पुढारी), दत्तात्रय पाटील (लोकमत), राजू काशिद (पुढारी),सागर लोहार (तरूण भारत), तानाजी पाटील(लोकमत), आप्पासाहेब रेपे (तरूण भारत), समाधान महातुगडे (किर्तीवंत), कृष्णात शेटके (तरूण भारत), एन.एस.पाटील (पुढारी), रघुनाथ पाटील (प्रेसफोटोग्रापर)आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक पत्रकार सागर लोहार यांनी केले तर आभार पत्रकार राजू काशिद यांनी मानले