|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक !- मुख्यमंत्री सचिवालय

साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक !- मुख्यमंत्री सचिवालय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते.

तथापि यवतमाळ येथे आयोजित अ.भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाटय़ावरून वाद चालू आहेत. यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न सुध्दा काही माध्यमे हेतूपुरस्सर करीत आहेत. अ.भा. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो. साहित्य संमेलनांमधून सरकारांवर, समाजातील निरनिराळया विषयांवर मते नेहमीच व्यक्त केली जात असतात. त्या मतांकडे अन् मंथनाकडे सरकारसुध्दा सकारात्मकपणेच पाहत असते. त्यामुळे अकारण ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करू नये.

Related posts: