|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » राफेल प्रकरण : संरक्षण मंत्री खोटे बोलत आहेत – राहुल गांधी

राफेल प्रकरण : संरक्षण मंत्री खोटे बोलत आहेत – राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्यावर हल्लाबोल केला. देशाच्या संरक्षण मंत्री संसदेत राफेल कराराबाबत धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. तर राफेलबाबत मोदी का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे.

‘हिंदुस्तान ऍरोनॅटिक्स लिमिटेड’सोबत (एचएएल) राफेलसाठी झालेल्या करारावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. राहुल यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सितारमन यांनी ‘2014 ते 2018 या कालावधीत एचएएलसोबत 26 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या करारावर स्वाक्षरी झाली असून आणखी 73 हजार कोटींचा करार होणे अपेक्षित आहे’ असे संसदेत स्पष्ट केले आहे. सितारमन यांचे हे विधान साफ खोटे असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. ‘एचएएल’ला सरकारकडून 1 लाख कोटी रूपये दिल्याचे सितारमन यांनी संसदेत सांगितले होते. पण आज सितारमन यांनी 26 हजार 570 कोटी दिल्याचे सांगितले. त्या वारंवार खोटे बोलत आहेत. मी विचारलेल्या प्रश्नांवर त्या संसदेत केवळ ड्रामा करत आहेत. माझ्या प्रश्नांवर हो किंवा नाही असे थेट उत्तर देऊ शकल्या नाहीत. राफेल करारावर संरक्षण मंत्रालयाच्या वरि÷ अधिकाऱयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते की नाही? याचे थेट उत्तर पंतप्रधान मोदी आणि सितारमन यांनी द्यावे, असे राहुल म्हणाले. देशाच्या संरक्षण मंत्री लोकसभेत मंत्रालयाच्या प्रवक्त्या असल्यासारखे बोलत आहेत, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.

Related posts: