|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग » पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत 6 कोटी लाभार्थी

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत 6 कोटी लाभार्थी 

मोफत गॅसजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण   2021 पर्यंत आठ कोटी घरांमध्ये स्वच्छ इंधन पोहोचणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित उज्ज्वला योजनेमुळे देशातील गरीब महिलांच्या स्वयंपाकघरापर्यंत मोफत घरगुती गॅसजोडणी मिळाली आहे. यामुळे सहा कोटी लाभार्थ्यांची संख्या झाली असून मोफत गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक स्वयंपाकघरात स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे उद्दिष्ट योजनेच्या माध्यमातून निर्धारित
झाले आहे.

प्रत्यक्षात 1 मे 2016 रोजी ‘उज्ज्वला योजना’ सुरू झाली. मार्च 2019 पर्यंत योजनेतून अजून पाच कोटी गॅसजोडण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. याशिवाय 2021 पर्यंत आठ कोटी घरांमध्ये स्वच्छ इंधन पोहोचविण्याचा निर्धार केला आहे. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी योजनेची स्तुती करत नवी दिल्लीतील शिवपार्क येथील जस्मिना खातून यांना सहा कोटी क्रमांकाची गॅसजोडणी प्रदान केली.

घरगुती सिलिंडरची सुरुवात झाल्यानंतर 50 वर्षात केवळ 13 कोटी जोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने तितक्याच जोडण्या दिल्या. याशिवाय पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 80 टक्के लाभार्थ्यांनी मिळालेल्या सिलिंडरचा पुनर्भरणाही केला आहे, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना स्वच्छ घरगुती इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 12,800 कोटींची तरतूद केली आहे.

विदेशात योजनेचे कौतुक

पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे देशातच नव्हे तर विदेशातही मोठय़ा प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. विकसनशील देशासाठी ही योजना आदर्श ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Related posts: