|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मध्यप्रदेशमधील नव्या विधानसभेच्या सत्रास प्रारंभ

मध्यप्रदेशमधील नव्या विधानसभेच्या सत्रास प्रारंभ 

भोपाळ

मध्यप्रदेशच्या 15 व्या विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. हंगामी सभापती दीपक सक्सेना यांनी आमदारांना शपथ दिली असून काँग्रेस आमदार एन.पी. प्रजापती यांनी विधानसभा सभापती पदासाठी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून विजय शाह यांनी अर्ज भरला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भाजप आमदारांसोबत वल्लभ भवनसमोर (राज्याचे मंत्रालय) वंदे मातरम् म्हटले आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. आमदारांचा शपथविधी मंगळवारपर्यंत चालू शकतो. शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभा सभापतीची निवड होणार आहे. विधानसभेत 10 जानेवारी रोजी 18,000 कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. भाजपचे उपाध्यक्ष तसेच राज्य प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे यांनी सोमवारी भोपाळचा दौरा करत प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनतर राकेश सिंग यांनी विधानसभा सभापती पदाची निवडणूक भाजप लढविणार असल्याची घोषणा केली आहे. शिवराज सिंग यांचा गट ही निवडणूक लढविण्यात येऊ नये या मताचा होता.

Related posts: