|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील कांदिवलीमध्ये भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

मुंबईतील कांदिवलीमध्ये भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई- कांदिवली परिसरात एका भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भाजी विक्रेत्यावर जवळपास डझणभर लोक चाकू, तलवारीने हल्ला करताना दिसत आहेत. कांदिवली पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांदिवलीमधील गणेश नगर भाजी मार्केटमध्ये सोमवारी (ता.7) ही घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी गोलू नामक भाजी विपेत्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात तनाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधत गुन्हा दाखल केला आहे.