|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » प्रिया दत्त या कारणामुळे लढविणार नाही लोकसभा निवडणूक ; राहुल गांधींना पाठवला मेल

प्रिया दत्त या कारणामुळे लढविणार नाही लोकसभा निवडणूक ; राहुल गांधींना पाठवला मेल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची बहीण आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मेल पाठवून लोकसभा निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया दत्त यांनी मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. प्रिया दत्त‍ यांनी दिलेल्या आपल्या निर्णयानंतर या मतदार संघासाठी काँग्रेसने नव्या उमदेवारासाठी चाचपणी सुरू केली आहे. या जागेसाठी सिनेतारकाला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस विचाराधीन आहे. याबाबत काँग्रेसने हलचाली सुरू केल्या आहेत.

प्रिया दत्त या कारणासाठी लढविणार नाही लोकसभा निवडणूक

दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक न लढविण्यामागे प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारण पुढे केले असले तरीही, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त यांनी हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत आघाडी केली आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपावरून सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दोन्ही पक्ष आपापले 20 उमेदवार मैदानात उतरविणार आहेत. उर्वरित आठ जागा इतर मित्र पक्षासाठी सोडण्यात येणा आहे.

Related posts: