|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » निमलष्करी दलांत महिलांची भागीदारी वाढणार

निमलष्करी दलांत महिलांची भागीदारी वाढणार 

सीआरपीएफ-सीआयएसएफमधील भागीदारी 15 टक्के होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) महिलांचे प्रतिनिधित्व किमान 15 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य लवकरच पूर्ण केले जाणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी  लोकसभेत ही माहिती दिली आहे.

सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट बॉर्डर पोलीस आणि सशस्त्र सीमा दलामध्ये हे लक्ष्य किमान 5 टक्के राहणार असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. सुरक्षा दलांमधील तैनाती आणि आत्महत्या प्रकरणांशी संबंधित प्रश्नावर मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. जवानांची तैनाती गरजेनुसार होते आणि समस्याग्रस्त भागांमध्ये तैनातीनंतर जवानांच्या मूलभूत गरजांची पूर्ण काळजी घेतली जाते. सुरक्षा दलांमधील संतुष्टतेचे प्रमाण वाढल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे.

सरकारने सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबल स्तरावर महिलांची 33 टक्के भरती सुनिश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. सीमेच्या सुरक्षेकरता तैनात दलांमध्ये (बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी) 14-15 टक्क्यांसह याची सुरुवात करण्यात आल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

वायुदलात 13 टक्के महिला

तिन्ही संरक्षण दलांपैकी वायुदलात महिलांची संख्या सर्वाधिक 13 टक्के आहे. नौदलात हा आकडा 6 टक्के तर सैन्यात केवळ 3.8 टक्के आहे. सशस्त्र दलांमधील वैद्यकीय सेवेत 21.63 टक्के आणि दंतवैद्यकीय सेवेत 20.75 टक्के महिला कार्यरत असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

Related posts: