|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जमखंडीत विविध संघटनेच्या कर्मचाऱयांचा मोर्चा

जमखंडीत विविध संघटनेच्या कर्मचाऱयांचा मोर्चा 

वार्ताहर/ जमखंडी

केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जमखंडीत अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या व मध्यान्ह आहार कर्मचाऱयांसह विविध संघटनेच्या कर्मचाऱयांनी मोर्चा काढून उपविभाग कार्यालयातील ग्रेड-2 तहसीलदार एस. एस. नायकलमठ यांना निवेदन दिले.

जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करावेत, निरुद्योग समस्या सोडवावी, किमान 18 हजार वेतन द्यावे, कर्मचाऱयांना गुलाम बनविणारे धोरण नसावे, काही योजनेत काम करणाऱया नोकरांना कायम करावे, सर्व कर्मचाऱयांना सामाजिक सुरक्षा द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

मोर्चाचे नेतृत्त्व अंगणवाडी, आशा व मध्यान्ह आहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले. कस्तुरी अंगडी, रेणुका पुजारी, जयश्री कंदगल, अन्नपुर्णा कामरे, चंद्राक्का न्यामगौड, महादेवी गुणदाळ, सुनंदा मोपगार, सुरेखा प्रधानी, लक्ष्मीबाई कोण्णूर, एस. एन. पाटील, सुनीता शिंदगी, मंगला बळोलगिडद, शकुंतला नडुवीनमनी, निलव्वा अरकेरी, रेणुका कदम, भारती तट्टी, चन्नव्वा हलकी, शोभा पाटील, एस. जी. गोळसंगी, एस. बी. हिरेमठ, एस. वाय. चिंचरवडी, एम. बी. मुळीक, एस. एस. हुगार, एस. एम. बिज्जरगी, एम. बी. सोरगोंड, सी. एच. आलगूर, एम. एम. डुमकी, पी. पी. कागी, के. एम. हजारे आदींसह ग्राम पंचायत, एलआयसी कर्मचाऱयांनी भाग घेतला होता.

संपात पोस्ट कर्मचाऱयांचा सहभाग

देशव्यापी संपात जमखंडी पोस्टल कर्मचाऱयांनी भाग घेऊन येथील प्रधान डाक कार्यालयासमोर निदर्शने केली. नवी पेन्शन पद्धत रद्द करून जुनी पद्धत सुरू करावी, किमान 50 टक्के पेन्शन करावी, कमलेश चंद्र आयोगातील घटनात्मक अंश जारी करावेत, इडीएस नोकरांना कायम करावे, रिक्त जागा भराव्यात, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. संपात आर. एम. थिटे, श्रीराम मण्णीकेरी, राजू मूर्ती, एस. एस. अगसीमनी, एस. डी, निलनायक, लक्ष्मण तलवार, एन. एस. हट्टी, व्ही. एम. काळगी, सी. एस. हनगंडी, एम. एच. नदाफ, एस. व्ही. कुलकर्णी, सविता कुऱहळ्ळीकर, सुजाता माचकनूर, एम. एन. जैन आदींनी भाग घेतला.