|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » आयएएस शाह फैसल यांचा सेवेतून राजीनामा , राजकारणात प्रवेश करणार

आयएएस शाह फैसल यांचा सेवेतून राजीनामा , राजकारणात प्रवेश करणार 

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिला काश्मिरी शाह फैजल यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. आता ते राजकारणात प्रवेश करणार आहेत. काश्मीरमधून ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत

35 वर्षीय फैजलने फेसबुकवर एका पोस्टरद्वारे राजीनाम्याचे कारण सांगितलं आहे. “काश्मीर खोऱयात सातत्याने लोक मरत आहेत आणि सरकार काहीही करत नाही. ’जम्मू कश्मीर राज्याच्या विशेष ओळखीवर कपटाने केलेला हल्ला तसेच भारतात अति-राष्ट्रवादाच्या नावावर असहिष्णुता तसंच द्वेषाची वाढती संस्कृती याविरोधात राजीनामा देत आहे, असे फैजल यांने लिहिले आहे.

फैजलच्या या निर्णयाचं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वटिरद्वारे स्वागत केलं आहे. “शाह यांचा राजीनामा प्रशासनासाठी नुकसानीचे आहे पण राजकारणासाठी फायदेशीर आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.

 

Related posts: