|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » विविधा » महाराष्ट्रातील 17 शहरांची हवा घातक, केंद्र सरकार नाराज

महाराष्ट्रातील 17 शहरांची हवा घातक, केंद्र सरकार नाराज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रदूषणाची सर्वोच्च पातळी गाठूनही त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या देशभरातील 102 शहरांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तातडीने ’ऍक्शन प्लान’ देण्याची सूचना दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अशा 17 शहरांची हवा नागरिकांसाठी घातक ठरत आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये 43 स्मार्ट सिटींचा समावेश आहे.

 

घातक हवा असलेल्या देशभरातील 102 शहरांची यादी केंद्राने चार महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ’राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम’ गुरुवारी सुरु केला. त्यावेळी, या 102 शहरांतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी तातडीने कृती योजना आराखडा सादर करावा, असं सांगण्यात आले.पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरातील नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वाधिक (घातक पातळी) असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. तर विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर ही सर्वात प्रदूषित शहरे आहेत.