|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » साहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध

साहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ साहित्यका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप सुरूच आहे. मराठी सारस्वतांच्या मेळय़ाला उत्साहात सुरुवात झाली खरी, पण त्यात निषेधाचे सूरही उमटले. संमेलनाला उपस्थित निमंत्रित तीन कवयित्रींनी नयनतारांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. त्यामुळं संमेलनात काही वेळ गोंधळाची स्थिती होती.

 

नयनतारा यांना दिलेलं निमंत्रण अचानक रद्द केल्यानं साहित्य संमेलनाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला होता. अनेक साहित्यकांनी या निर्णयानंतर निषेध नोंदवला होता. संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरू असतानाच, निमंत्रित प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या तीन कवयित्रींनी नयनतारा यांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. यानंतर संमेलनाच्या मंडपात थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलिसांनी त्यांना मुखवटे काढून ठेवण्यास सांगितले. त्यांच्याकडील मुखवटे जप्त करून त्यांना मंडपातून बाहेर काढण्यात आले.

 

Related posts: