|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रस्त्याचे पुढे काम सुरू आणि मागे उकरा उकरी

रस्त्याचे पुढे काम सुरू आणि मागे उकरा उकरी 

प्रतिनिधी/ गोडोली

रस्त्याचे काम सुरू होण्यापुर्वी झोपा काढल्या क़ा ?, खराब रस्तावर झालेल्या अपघाताने अनेकाना कायमचे अपंगत्व आले आहे.अजून रस्त्याचे काम पुर्ण झाले नसताना तो उकरला तर पोलीस केस करेन,असा सज्जड दम बांधकाम विभागाच्या अभियंत्यांला सामाजिक कार्यकत्यांनी दम भरला.दोन महिन्यापासून आवाहन करून ही प्राधिकरणाच्या पाण्याची पाईप लाईन न टाकता रस्त्याचे काम झाल्यावर चोरून टाकण्याचा प्रयत्न करणाऱया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा भर रस्त्यावर काही नागरिकांनी चांगलाच पाणउतारा केला. पुढे काम सुरू आणि उकरा उकरी सुरू अशा सातारी तऱहा हास्यास्पद नाही तर संतापजनक प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केल्या. 

           भु-विकास बंक ते जुना आरटीओ कार्यालय पर्यंतचा रस्ता खराब झाल्याने अनेकांना अपघातामुळे कायम स्वरूपी अपंगत्व आले.याच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप पुर्ण झालेल्या नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईप लाईनसाठी रस्त्या उकरला.दोन महिने आधीपासून पाईप लाईन टाकून घेण्याचे आवाहन प्राधिकरण विभागाने केले असताना झोपलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याने परस्पर पाईपलाईन टाकण्याचा प्रकार करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अटकाव केला.

 सदरचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असताना ही मोठया प्रमाणावर तो उखडला होता.त्याच्या डांबरीकरणासाठी अनेकांनी आवाज उठविला तर आमदारांनी थेट स्व खर्चाने खडडे भरून नगरपरिषदेला अकार्यक्षमतेचा शह दिला होता.त्यांनतर ठेकेदारांची वर्क ऑर्डर निघली की तात्काळ या रस्त्याचे काम सुरू झाले.हे काम सुरू होण्यापुर्वी या परिसरातील नागरिकांना प्राधिकारण,नगरसेवक,सामाजिक कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन जोडून घ्या, तसेच गळती काढण्याचे आवाहन केले होते.सर्वांनी तात्काळ याप्रमाणे केले.

       मात्र यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीच केले नाही. रस्त्याचे काम अद्याप सुरू असताना शुक्रवार दि.11 रोजी चार कामगारांना घेऊन रस्ता उकरायला सुरूवात केली.यावेळी परिसरातील माजी नगरसेवक राम हादगे,सुनिल जाधव,सुनिल भंडारी यांच्या सह अनेक नागरिकांनी त्याला अटकाव करत उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा भर रस्त्यात पाणउतारा केला.पुढे काम सुरू आणि उकरा उकरी सुरू अशा सातारी तऱहा भर रस्त्यावर येणाजाणारे पाहून हसत होते.

Related posts: