|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा येथे 16 रोजी ‘छत्रपती शंभुराजे राज्यभिषेक’ सोहळा

फोंडा येथे 16 रोजी ‘छत्रपती शंभुराजे राज्यभिषेक’ सोहळा 

प्रतिनिधी पणजी

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा दि. 6 जानेवारी 1691 साली झाला होता व त्याची उजळणी करणे तसेच त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीला कळावे या उद्देशाने फोंडा किल्ल्यावर बुधवार दि. 16 जानेवारी रोजी किल्ले फ्ढाsंडा येथे ‘छत्रपती शंभूराजांचा राज्यभिषेक’ सोहळा आयोजित केला आहे. हिंदवी स्वराज्य संघटना, छत्रपती शंभुराजे राज्यभिषेक ट्रस्ट, महाराष्ट्र आणि गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने हा सोळा होणार असल्याची माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर, छत्रपती शंभुराजे राज्यभिषेक ट्रस्ट, महाराष्ट्रचे अमरसिंह जाधव, नंदादीप नाईक, नामदेव नाईक, कृष्णनाथ नाईक, आश्विनकुमार नाईक, आदित्य, गोविंद शिरोडकर व इतरांची उपस्थिती होती. पीईएस, जीव्हीएम, सारस्वत, अमेय, कामाक्षी, मडकई उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी या सोळ्यास उपस्थित राहणार असून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मंत्री गावडे म्हणाले की, सकाळी 7 ते 8 वा. श्री सप्तकोटेश्वर देवस्थान नार्वे येथे स्थानिक आमदार प्रवीण झांटय़े यांच्याहस्ते सप्तकोटेश्वर मंदिर शिवलिंगास अभिषेक केला जाईल. नंतर श्री गणेश मंदिरापासून फ्ढर्मागुडी किल्ले फ्ढाsंडापर्यंत पालखी व शोभायात्रा होईल. त्यानंतर विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱया रणरागिणींच्याहस्ते 11 नद्यांचा पवित्र जलाने शंभूराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येईल.

सोहळ्यात प्रा. रामकृष्ण कदम संपादित ‘संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ पुस्तक प्रकाशन सोहळा, चित्रकार दिनेश काची यांचे ‘श्री सप्तकोटेश्वराची आराधना करताना छत्रपती शिवराय’ या तैलचित्राचे अनावरण आणि चित्रकार विश्वनाथ खिलारी यांच्या ‘छत्रपती संभाजी राजांचे अस्सल चित्र’ तैलचित्राचे अनावरण करण्यात येईल.

या सोहळ्यात कोल्हापुर येथील इतिहास अभ्यासक भगवानराव चिले यांचे ‘महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज’ विषयावर व्याख्यान होणार आहे. समारोपाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये गोवा विधानसभा सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे मनोगत व्यक्त करणार आहे.

Related posts: