|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » टमटम उलटून दोन ठार

टमटम उलटून दोन ठार 

विजापूर/वार्ताहर

कापूस वाहतून करणारा टमटम वाहन उलटून झालेल्या अपघात दोघे जागीच ठार तर चारजण जखमी झाले. सदर घटना शुक्रवार 11 रोजी दुपारी विजापूर-मुद्देबिहाळ मार्गावर घडली. साहेबगौडा कुंटरेड्डी (वय 65) व कोडेप्पा मडिवाळकर (वय 60) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी एक टमटम मुद्देबिहाळहून विजापूरकडे कापूस घेऊन जात होता. त्यावेळी मार्गावरील एका वळणावर चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने टमटम उलटला. यात साहेबगौडा पुंटरेड्डी व कोडेप्पा मडिवाळकर हे टमटमच्या खाली सापडले. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चारजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच बसवन बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद बसवन बागेवाडी पोलिसात झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Related posts: