|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » बेस्ट संप : दोन दिवसात तोडगा काढा अन्यथा रस्त्यांवर तमाशा होईल : मनसेची ‘बेस्ट’ संपात उडी

बेस्ट संप : दोन दिवसात तोडगा काढा अन्यथा रस्त्यांवर तमाशा होईल : मनसेची ‘बेस्ट’ संपात उडी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेस्ट कर्मचाऱयांचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्मयता आहे. मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र तोडगी निघालेला नाही. अशातच कर्मचारी संतप्त झाले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संपात उडी घेतली आहे. बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यांवर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱयाची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱयांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱयांना साथ द्यायला हवी, असे आवाहन देखील देशपांडे यांनी केले आहे. वडाळा डेपोत बेस्ट कर्मचाऱयांची भेट घेतल्यानंतर देशपांडे म्हणाले, संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत पण तुमच्या मनात मुंबईकरांचे हाल व्हावे अशी इच्छा नाही. इतका अन्याय होऊनही तुम्ही संप पुकारला नाही, आता मुंबईकरांनी बेस्टचा विचार करावा. आम्हाला मुंबईकरांना वेठीस धरायचे नाही, पण प्रशासन कामगारांना वेठीस धरणार असेल तर आमचा नाइलाज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाने आम्हाला वेठीस धरू नये, प्रशासनातील अधिकाऱयांनी आम्हाला घाबरवू नये, स्वतःच्या पायावर बाहेर पडायचे असेल तर आमच्या वाटय़ाला जाऊ नका, असा इशाराच त्यांनी अधिकाऱयांना दिला. बेस्ट कर्मचाऱयांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी हा इशारा दिला. सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यांवर तमाशाच होईल आणि यासाठी जबाबदारी प्रशासन व सत्ताधाऱयांची असेल, असे त्यांनी म्हटले आहे.