|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील मेजर शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील मेजर शहीद 

ऑनलाईन टीम / पुणे :

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एक मेजर आणि एक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले मेजर शशीधरन व्ही. नायर पुण्याचे रहिवाशी आहेत. नायर मूळ केरळचे आहेत, मात्र सध्या ते पुण्यातील खडकवासलात राहत होते.

मेजर शशीधरन हे 33 वर्षांचे होते. 33 वर्षांपैकी 11 वर्षांपासून ते देशसेवा करत होते. मेजर नायर यांचे पार्थिव आज पुण्यात येणार आहे. शशीथरन यांच्या पश्चात पत्नी तृप्ती नायर आहेत. संशयित दहशतवाद्यांनी जवानांना टार्गेट करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या लाम परिसरातील नियंत्रण रेषेवर आयईडी स्फोट घडवून आणला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात एका मेजरसह दोन जवान गंभीर जखमी झाले होते. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर ऍक्शन टीमने घडविला असल्याचे समजते. भारतीय जवानांना आयईडी स्फोट आणि पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमकडून हल्ल्याबाबत अलर्टही देण्यात आला होता.