|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कथानक पुढे न सरकणाऱया मालिका पाहण्यापेक्षा नाटक पाहा!

कथानक पुढे न सरकणाऱया मालिका पाहण्यापेक्षा नाटक पाहा! 

ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांचा सल्ला : मालवणात स्वराध्या फाऊंडेशनच्या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन

वार्ताहर / मालवण:

लोककलांचे संवर्धन व्हावे, याठी झटणारे अनेक कलावंत ग्रामीण भागात असतात. हे कलावंत प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहिलेले असतात. अशा कलावंतांची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील स्थानिक कलावंतांचे कार्य चरित्रातून येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिने-नाटय़ अभिनेते संजय मोने यांनी येथे केले.

प्राईड लॅण्ड प्रॉपर्टीज एलएलपी प्रायोजित आणि स्वराध्या फाऊंडेशन आयोजित मामा वरेरकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनप्रसंगी मोने बोलत होते.   आरोग्य सभापती पंकज सादये, भालचंद्र कुबल, स्वराध्याचे अध्यक्ष सुशांत पवार, गौरव ओरसकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.

मोने म्हणाले, स्थानिक लोककलावंतांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कलेसाठी आपले आयुष्य वाहिलेले असते. स्वत:चे घर सांभाळून परदमोड करीत लोककला जीवंत ठेवण्यासाठी कलावंतांना झटत असताना, अशा कलावंतांची माहिती सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. सध्या अनेक रसिक कथानक पुढे न सरकणाऱया मालिका पाहण्यात वेळ घालवतात. परंतु या मालिका पाहण्यापेक्षा नाटके पाहण्यासाठी वेळ दिल्यास नाटकांना चांगले दिवस येतील. हरी खोबरेकर म्हणाले, स्वराध्या फाऊंडेशनने नाटय़ चळवळीला दिशा देण्याचे काम केलेले आहे. अनेक वर्षे नाटय़ चळवळीसाठी योगदान देणारी नाटय़मंडळे तसेच नाटय़ कलावंत यांच्या सन्मानाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.

दांडी ग्रामस्थ मंडळ व बापू कोयंडेंचा सन्मान

गेली अनेक वर्षे नाटय़चळवळीत उल्लेखनीय योगदान देणाऱया दांडी ग्रामस्थ मंडळाला स्वराध्या सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रंगभूमीसाठी अनेक वर्षे योगदान देणाऱया ज्येष्ठ कलावंत बापू कोयंडे यांचाही स्वराध्या फाऊंडेनशतर्फे सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन कांचन खराडे यांनी केले. आभार गौरव ओरसकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वराध्या फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related posts: